-- Secondary School Events --

जी. एस. आमोणकर विद्यामंदिरात माजी विद्यार्थ्यांचा री-युनियन सोहळा

जी. एस. आमोणकर विद्यामंदिरात माजी विद्यार्थ्यांचा री-युनियन सोहळा
म्हापसा-जी. एस. आमोणकर विद्यामंदिर या शाळेच्या १९९९ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल २९ डिसेंबर २०२४ ला शाळेच्या सभागृहात री-युनियन सोहळा साजरा केला. शाळेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. राज आमोणकर कार्यक्रमास उपस्थित होते. तसेच शाळेचे अध्यक्ष संजय उसगावकर, मुख्याध्यापिका सौ. पूजा दळवी व उपमुख्याध्यापिका सौ. झेना व्हियेगस कार्यक्रमास उपस्थित होत्या. पूनम पोरोब यांनी डॉ. राज आमोणकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. विद्यार्थी जीवनाला योग्य आकार देण्याचे काम शिक्षक रुपी शिल्पकार करतो याची जाणीव ठेवून शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी भेट व स्मृतिचिन्ह देऊन आपल्या शिक्षकांचा सत्कार केला . तसेच शाळेसाठी एकूण २,७४,५०० रुपये किंमतीचे १६ कम्प्युटर व १ प्रोजेक्टर दान केले. तद्नंतर त्यांनी शाळेतील आपल्या जुन्या आठवणीही सांगितल्या. शाळेचे अध्यक्ष ॲड . संजय उसगावकर, मुख्याध्यापिका सौ. पूजा दळवी, उपमुख्याध्यापिका सौ. झेना व्हियेगस व शाळेच्या माजी मुख्याध्यापिका मेबल डिसुझा यांची समर्पक भाषणे झाली. शाळेचे अध्यक्ष ॲड .संजय उसगावकर यांनी आपल्या भाषणात म्हटले की ते जी. एस. आमोणकर विद्यामंदिर या शाळेचे माजी विद्यार्थी आहे हे त्यांचे भाग्य आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अमित बांदेकर व श्री. श्रीकांत नाईक यांनी केले व बेवन्ली ब्रागांझा यांनी आभार मानले.